अजित पवारांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

अजित पवारांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ.!

आता राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, राज्यातील पिककर्जची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत पिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कर्जमाफीची यादी ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

⬇️⬇️हे ही वाचा⬇️⬇️

Land Record 7rules: आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..

पीक लोन 0% व्याजदर बँक कोणत्या बँक आहेत?

ही योजना राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका आणि खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लागू आहे, परंतु थकीत कर्ज तसेच मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांना लागू नाही.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराशी संबंधित व्याजात सवलत दिली जात आहे.

03/12/2012 च्या शासन निर्णयानुसार रु.1 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 3% आणि रु.3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर 1% वार्षिक दराने व्याज सवलत लागू करण्यात आली आहे.तसेच, दिनांक 11/06/2019 च्या शासन निर्णयामध्ये 3 लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या 3% व्याज सवलतीचा विचार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 0% व्याजदराने उपलब्ध.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

👉🏻👉🏻अशाच तसेच नवनवीन महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻👈🏻

1 thought on “अजित पवारांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ”

Leave a Comment

Verified by MonsterInsights