Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय..

Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय..

आजच्या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर अजूनही प्रचंड गर्दी आहे. रस्त्यांसह काही गावात पाणी शिरल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काही जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफची टीम सर्वत्र लोकांना मदत करत आहे. रस्त्यांसह काही गावात पाणी शिरल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

शासन निर्णय जाहीर :- शेतकऱ्याला प्रति हेक्टर 22,500 हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटक आणि नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने बसेस रेल्वे स्थानकाबाहेर पाठवण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, भायखळा, दादर स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी आणखी बस सोडण्यात आल्या आहेत. सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन सुरू असून मुंबईतील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. एनडीआरएफच्या सर्व तुकड्या रवाना झाल्या असून सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. रायगडमधील पाणीसाठा कमी होत असून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला असल्याचेही शिंदे म्हणाले.
.
दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये. प्रत्येक ठिकाणी एनडीआरएफ आणि स्थानिक एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या असून प्रत्येकजण जबाबदारीनुसार काम करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आवश्यकतेनुसार शाळांना सुटी जाहीर करावी. शालेय स्तरावर योग्य निर्णय घेण्याचा अधिकार शाळांना आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी शाळांना दिल्या आहेत.

👉🏻👉🏻अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा👈👈👈

1 thought on “Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय..”

Leave a Comment

Verified by MonsterInsights