शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर ट्रॉलीलाही मिळणार अनुदान, किती देणार अनुदान? पहा…
Agriculture Scheme Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून शेतकरी विविध आव्हानांना तोंड देत आहेत. यामध्ये मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, मजुरांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता यांत्रिकीकरणामुळे शेती व्यवसायाला चालना मिळत आहे. शेतीच्या कामासाठी आता विविध यंत्रांचा वापर केला जात आहे.मशागतीपासून कापणीपर्यंत आणि आंतरपीक घेण्यापर्यंत यंत्रांचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरवर चालणाऱ्या यंत्रांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. दरम्यान, कृषी यंत्रासाठीही शासन अनुदान देत आहे. त्यासाठी राज्य शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना राज्यभर सुरू आहे.
या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीसाठीही अनुदान मिळणार आहे.या वर्षापासून ट्रॉलीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे एका प्रतिष्ठित प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. दरम्यान, आज आपण ट्रॉली अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि त्यासाठी किती टक्के अनुदान दिले जाणार आहे, याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय..
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षीपासून ट्रॉलीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शेतकरी, महिला शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. तसेच शेतकरी गट गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांनाही अर्ज करता येणार आहेत.
किती अनुदान मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार ट्रॉलीसाठी ४५ ते ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अर्ज कुठे करायचा?
राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या विविध गटांना ट्रॉलीसाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून त्यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. शेतकऱ्यांना ट्रॉलीच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावा लागतो.
👉🏻👉🏻अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा👈👈👈
1 thought on “शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर ट्रॉलीलाही मिळणार अनुदान, किती देणार अनुदान? पहा…”